चौसाळा – देवीबाभुळगाव रस्त्यावरील साईड पंख्यावर रोवले विजेचे खांब
महावितरणच्या दुर्लक्षाने प्रवाशांच्या जीवितस धोका निर्माण
बीड : नव महाराष्ट्र न्यूज
महाराष्ट्राची धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकरवाडी या देवस्थानकडे चौसाळा – देवीबाभुळगाव – सात्रा – पोत्रा – आंबील वडगाव मार्गे चाकरवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर चौसाळा ते देबीबाभुळगाव च्या दरम्यान महावितरण विभागा मार्फत वीज वाहिनीचे खांब (पोल) उभारण्याचे काम सुरू आहे. सदरील कामामध्ये अनेक ठिकाणी वीज पोल रस्त्याच्या कडेला साईड पंख्यावर अवघ्या ४ ते ५ तर कुठे ५ ते ६ फुट अंतरावर उभे केले गेले आहेत.

सदरील रस्ता हा चाकरवाडी या देवस्थानकडे जात असल्याने हा दैनंदिन मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा रस्ता असून वाहतुकीची वर्दळही कायम मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीत रस्त्याला लागूनच उभारलेले वीज पोल हे वाहतुकीस गंभीर धोका निर्माण करणारे असून त्यातून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना पुढील परिणाम उद्भवू शकतात – वाहनांचे रस्त्यावरून सुटण्याची किंवा घसरून पोलला धडकण्याची शक्यता वाढते, दोन चाकी व चार चाकी वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अपघाताचा धोका निर्माण होत आहे, रात्रीच्या वेळी दृश्यमर्यादा कमी असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढत आहे, महावितरणच्या नियमांनुसार मुख्य रस्त्यापासून सुरक्षित अंतर राखूनच वीज पोल उभारणी करणे बंधनकारक आहे. त्या संदर्भात नियमांचे पालन न झाल्याचे दिसून येते.
सदरील कामाकडे महावितरण कार्यालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. म्हणूनच किमान आता तरी महावितरण विभागाने व सदरील कंत्राटदार कंपनीने, सदरील बाबीची तात्काळ दखल घेऊन चौसाळा ते देवीबाभुळगाव या मार्गावरील वीज पोलचे पुनर्मापन करून ते महावितरणच्या नियमांप्रमाणे रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर स्थानांतरित करण्यात यावेत. यामुळे अपघाताचा धोका टळेल व नागरिकांचा दैनंदिन प्रवास सुरक्षित होईल.
महावितरण कार्यालयाचे अभियंता हे जाणीवपूर्वक या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत. सदरील विजेचे पोल सुरक्षित योग्य अंतरावर स्थलांतरित करावेत. नसता जिल्हाधिकारी कार्यालासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल.
—-विवेक कुचेकर (सामाजिक कार्यकर्ते, चौसाळा)
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -