Monday, March 2, 2026
spot_img

धाराशिव जिल्ह्यातील हा कारखाना देणार ऊसाला 3000 रुपये पहिली उचल

नॅचरल शुगरचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांची माहिती

धाराशिव : नव महाराष्ट्र न्यूज

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेला रांजणी येथील नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज हा कारखाना चालू गळीत हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसाला प्रति टन 3000 रुपये याप्रमाणे पहिली उचल विना कपात देणार असल्याचे माहिती नॅचरल शुगर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दिली. या कारखान्याचा यावर्षीचा हा 24 वा गळीत हंगाम नुकताच सुरू झाला आहे.

ऊस गळफास आल्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसाचे बिल ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असे कारखान्याचे अध्यक्ष ठोंबरे यांनी सांगितले. या कारखान्याची प्रति दिवस 7500 मेट्रिक टन एवढी गाळप क्षमता आहे. पूर्ण क्षमतेने गाळप होण्यासाठी गाळपास लागणारी ऊसतोड यंत्रणा यावर्षी अगोदर पासूनच तयार करण्यात आलेली आहे. यावर्षी या कारखान्यामध्ये साधारणतः पूर्ण गळीत हंगामात 13.25 लाख मॅट्रिक टन ऊस गळफाचे उद्दिष्ट समोर ठेवून नियोजन करण्यात आलेले आहे.

त्यामुळे जास्तीत – जास्त ऊस उत्पादकांनी उसाचा पुरवठा करावा. जेणेकरून उद्दिष्टानुसार उसाचे गाळप करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जादा दर देणे शक्य होईल. तसेच याशिवाय कारखान्यांच्या विविध उपक्रमाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून जास्तीत जास्त भाव देण्याचा कारखान्याचा प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे कारखाना क्षेत्रातील सभासद व बिगर सभासदांनी नोंदवलेल्या संपूर्ण उसाचे गाळप साधारणतः एप्रिल 2026 अखेर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे. तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाची इतरत्र विल्हेवाट करून आपले आर्थिक नुकसान करू नये असे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी आवाहन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles