Thursday, February 26, 2026
spot_img

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत आता शेतमजुरांचा समावेश

नागपूर : नव महाराष्ट्र न्यूज

शेतीची काम ही शेतकऱ्यांबरोबरच शेत मजुरांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. मात्र शेतमजुरांना आत्तापर्यंत शासन स्तरावर कोणतीही सामाजिक सुरक्षितता देण्यात आली नव्हती. त्यामुळेच गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत यापुढील काळात मजुरांचा समावेश करण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी 11 डिसेंबर गुरुवारी रोजी विधान परिषदेत दिली आहे.

सत्ताधारी पक्षाच्या वतीने दाखल प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना नियम 260 नुसार कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल बोलत होते. पुढे ते असे म्हणाले की, “यापूर्वी गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना जाहीर करण्यात आली. त्यावेळी यामध्ये शेतकरी त्याची पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यांना विमा संरक्षण देण्यात आले होते. परंतु, याचा लाभ अपेक्षित प्रमाणात मिळत नव्हता. त्यामुळेच या योजनेत व्यापक बदल करून आता त्यामध्ये शेतमजुरांचाही समावेश करण्यात येईल.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles