दि. 01.11.2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणे बाबत कार्यक्रम अनुषंगाने राजकीय पक्षासोबत बैठक संपन्न
दिनांक 30 सप्टेंबर, 2025 (मंगळवार) रोजीपासून पदवीधर मतदार नोंदणी सुरु आहे-
मा. भारत निवडणूक आयोगाने 5 औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या दि. 01.11.2025 या अर्हता दिनांकावर आधारीत पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करणे बाबतचा कार्यक्रम घोषीत केलेला आहे. बीड जिल्ह्यातील सर्व पदनिर्देशीत अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय कार्यालय, सर्व तहसिल कार्यालयामध्ये मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांचेसमवेत दिनांक 30.09.2025 रोजी दुपारी 4.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये दिनांक 01.11.2022 पुर्वी उत्तीर्ण झालेल्या नागरीकांनी पदवीधर मतदार यादी नव्याने तयार होणाऱ्या मतदार यादीमध्ये नोंदणीसाठी नमुना अर्ज 18 भरून नोंदणी करणे अनिवार्य असल्याची माहिती देण्यात आली. मतदार नोंदणी करण्यासाठी पुढील कार्यपध्दीती वापरावी.
1) नमुना अर्ज क्र. 18 ( संपुर्ण निळ्या किंवा काळया शाईने मराठी किंवा इंग्रजी मध्ये भरलेला.
2) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापिठाचे पदवी प्रमाणपत्र किंवा पदवीच्या अंतीम वर्षाची मार्कशीट ची झेरॉक्स प्रत.
3) पासपोर्ट साईज फोटो (01 अर्जावर नमूद ठिकाणी चिटकलेला, व 01 अर्जासोबत स्टेपल करुन द्यावा.
4) मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड यापैकी एक
अर्जासोबत सर्व कागदपत्र ही स्व-साक्षांकित करावीत व 01 फोटो हा अर्जावर चिकटवावा (स्टेपल करु नये) व 01 फोटो अर्जासोबत पारदर्शक कॅरेबॅग मध्ये स्टेपल करुन सादर करावा. विवाहीत महिलांच्या नावात बदल असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र अथवा रात्रपत्र जोडणे आवश्यक आहे. सदरचे अर्ज हे मंडळ निहाय महसूल मंडळाचे मुख्यालयी मंडळ अधिकारी यांचेकडे सादर करता येतील
अर्जदार हा नोकरदार असेल तर त्यांनी अर्जासोबत 3 री अनुसूची मधील विहीत नमून्यातील प्रमाणपत्र हे राजपत्रित अधिकारी यांचे स्वाक्षरीने जोडणे आवश्यक आहे. कार्यालय / शाळा कडून एकगठ्ठा पध्दतीने आलेले अर्ज हे सादर करताना उपरोक्त सर्व सुचना प्रमाणे तयार करुन एकत्र 01 यादी तयार करुन ती सादर करावी. तसेच https://mahaelection.gov.in/Citizen/Login या प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे , ऑनलाईन पध्दतीने नमुना अर्ज 18 सादर करता येतील.
या कार्यक्रमानुसार दिनांक 06 नोव्हेंबर, 2025 पर्यंत पदवीधर नोंदणीसाठी नमुना अर्ज 18 भरण्याची अंतिम तारीख आहे, दिनांक 06 नोव्हेंबर, 2025 पर्यंत झालेल्या नोंदणीची दि. 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे, प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीनंतर दिनांक 25 नोव्हेंबर 2025 ते 10 डिसेंबर, 2025 या कालावधी दावे व हरकती स्विकारण्यात येतील, दिनांक 25 डिसेंबर, 2025 रोजी प्राप्त दावे व हरकती निकाली काढणे व पुरवणी यादी तयार करण्यात येईल व अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी दिनांक 30 डिसेंबर, 2025 रोजी होईल. करीता बीड जिल्ह्यातील दिनांक 01.11.2022 पुर्वी पदवी उत्तीर्ण असणारे सर्व नागरिकांना 5 औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या मतदार यादीमध्ये जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहाकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी, बीड तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, 5 औरंगाबाद पदवीधर मतदार संघ यांचे तर्फे करण्यात येते.



