बीड (प्रतिनिधी) : आर्ट ऑफ लिव्हिंग च्या आनंद अनुभूती शिबाऱ्याच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील हांगेवाडी येथे जलतारा प्रबोधन व प्रात्येक्षिक कार्यशाळा समस्त हांगेवाडी येथील सर्व गावकरी व कला विज्ञान महाविद्यालय नांदुर घाट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जलतारा चे मुख्य संशोधक व प्रवर्तक प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ सर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. तर अध्यक्ष म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग मराठवडा समन्वयक व मॅनेजर SBI धारूर श्री राहुल पाटील सर व विशेष उपस्थिती माझी आयुक्त अच्युत नाना हंगे हे होते.

याबरोबरच जिल्हा परिषद सदस्य आणि माजी समाजकल्याण सभापती संतोष दादा हांगे,कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाचे सचिव अँड संतोष दादा सावरगावकर आणि प्राचार्य डॉ.मुंडे सर हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रा वायाळ सरांनी जलतारा ही योजना काय आहे ही योजना शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती केल्याशिवाय राहणार नाही याचे प्रबोधन समस्त गावकऱ्यांना करून दिले जलताराचे महत्त्व समजून सांगितले जलतारा योजना आपल्या हंगेवाडी मध्ये राबवण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करून जलताराचे नियोजन करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आम्ही कायम उपलब्ध करून देऊ असे सांगितले.

माजी जिल्हा परिषद सभापती संतोष हंगे यांनी जलतारा ही योजना समजून घेऊन आपल्या भाषणात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी किती महत्त्वाचे असल्याचे सांगून जलतारासाठी लागणारे यांत्रिकीकरण संतोष दादा हंगे आणि संजय आबा हंगे यांनी जे सी बी उपलब्ध करून देण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले आहे याबरोबरच कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे सचिव अँड संतोष दादा सावरगावकर यांनी डिझेल साठी आर्थिक मदत देण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले.समारोप करताना माझी आयुक्त अच्युत नाना हंगे यांनी जलतारा कार्यकामासाठी लागणारे आर्थिक बळ आणि प्रत्यक्ष कामाबरोबर राहण्याचे आश्वासन सर्व गावकऱ्यांना दिले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन राहुल गिरी यांनी केले.फेब्रुवारी महिन्यात सर्व गावकरी जलतारा संशोधन केंद्र वाटूर येथे भेट देण्यास जाणार असून कार्यशाळेच्या प्रभावामुळे गावातील वातावरण असे दिसून येते की नक्कीच जलतारा मुळे हंगेवाडी येथे जलक्रांती येणार.
या कार्यशाळेचे आयोजन आर्ट ऑफ लिव्हिंग जिल्हा समन्वयक प्रा. संतोष सावंत, माझी सैनिक श्रीराम हंगे,संजय आबा हंगे,प्रा.सुधाकर नाना हंगे,अनंत बप्पा हंगे,हनुमंत आंधळे, राजकुमार हांगे,से स सो संचालक शेशिकांत हंगे, उपसरपंच सुरेश बप्पा यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेसाठी गावातील बहुसंख्य शेतकरी आणि कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा स्टाफ बहुसंख्येने उपस्थित होता.



