दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२५ च्या अध्यक्षपदी वैष्णवी कोकरे यांची निवड
बीड : नव महाराष्ट्र न्यूज
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर देश-विदेशात पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल २०२५ च्या अध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील कवयित्री वैष्णवी कोकरे यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. सदरील फेस्टिवल पुणे येथील एस. एम. जोशी फाउंडेशन समाजभवन येथे दि. २, ३, ४ व ५ जानेवारी २०२५ दरम्यान हा चार दिवसांचा महोत्सव आयोजित केला असल्याचे पत्रकार द्वारे संयोजकांनी कळवले आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील व परदेशातील कवींसाठी हा फेस्टिव्हल एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असून, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समता, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक न्याय व संविधानवादी विचारधारेवर आधारित कविता सादरीकरणासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली आहे. निवड झालेल्या कवींना फेस्टिव्हलदरम्यान आपली कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी बीडच्या कवयित्री वैष्णवी कोकरे यांची निवड झाली आहे. वैष्णवी यांच्या माध्यमातून होत असलेल्या महोत्सवामध्ये बीड ला सन्मान मिळाला आहे. निवड झालेल्या कवींनी ४ जानेवारी २०२५ रोजी कविता सादरीकरणासाठी उपस्थित राहावे, असे आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कविता सादरीकरणास कोणतेही मानधन नसले तरी सहभागी कवींना भोजन, नाश्ता व राहण्याची सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच कविता सादरीकरणानंतर सहभागी कवींना सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून फुले दांपत्यांचे विचार, संविधान मूल्ये आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा फेस्टिव्हल “जय जोती, जय सावित्री, जय समता, जय बुद्ध, जय फुले, जय संविधान” या विचारधारेचा जागर करणारा ठरणार असल्याचे आयोजक विजय अभिमान बंडगर यांनी सांगितले.
Like this:
Like Loading...
Related
- Advertisement -