बीड (प्रतिनिधी)
दि.१० : बीड व शिरूर कासार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्त्यांसह पुलांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर यांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांसोबत बीडमध्ये गुरुवारी (दि.९) चर्चा करण्यात आली. यावेळी विभाग अंतर्गत येणाऱ्या रस्ते व पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.



